क्र (२०६) बत्ताशासारखे पदक कोठे आहे

गिरनार द्वारका सुदामपुरी वगैरे यात्रा करुन वामनबुवा बडोद्यास आले महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून प्रत्येक क्षेत्रातील एक वस्तू अर्पण करावी म्हणून त्या सर्व वस्तू घेऊन ते शके १७९६ (इ.स.१८७४) भाद्रपद शुद्ध ६ रोजी ते अक्कलकोटास आले आणलेल्या वस्तू त्यांनी श्री स्वामींपुढे ठेवल्या त्या पाहून बत्ताशा सारखे आणलेले पदक कोठे आहे हे श्री स्वामींचे बोलणे ऐकून बडोद्याहून येताना डब्यात काढून ठेवलेली पदके आणण्यास विसरलो असे मनोमन समजून झालेल्या चुकीची वामनबुवांनी महाराजांजवळ क्षमा मागितली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री वामनबुवा हे विद्वान संस्कृत पंडित होते श्री स्वामींच्याच आशीर्वादाने पुढे ते ब्रम्हनिष्ठ झाले ते सतत तीर्थयात्रा करीत फिरत असत तीर्थयात्रा करुन झाल्यानंतर अक्कलकोटी जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा त्यांचा नित्य परिपाठ होता श्री स्वामी सेवेत महिना दीड महिना राहून या काळात त्यांच्या मनातील आध्यात्मिक शंका कुशंकांचा उलगडा अर्थबोध श्री स्वामींकडून करुन घेत श्री स्वामींनाही त्यांच्याशी चर्चा करायला आवडे असेच एकदा गिरनार द्वारका सुदामपुरी इ.तीर्थयात्रा करुन ते बडोद्यास आले तीर्थक्षेत्राहून आणलेल्या वस्तू श्री स्वामींस अर्पण करण्यासाठी त्यांनी बांधून ठेवल्या तळहाताएवढे मोठे साखरेचे खास बत्तासे श्री स्वामींसाठी त्यांनी अर्पण करण्याचे ठरविले होते परंतु ते बरोबर घ्यायचे ते विसरुन गेले श्री स्वामींपुढे ते पदार्थ अर्पण केल्यानंतर महाराज म्हणाले बत्ताशा सारखे आणलेले पदक कोठे इहे हे ऐकताच वामनबुवांना ती पदके (बत्तासे) घरीच विसरुन राहिल्याचे आठवले आपल्या या असल्या विसराळूपणाबद्दल बुवांनी श्री स्वामींची क्षमाही मागितली वास्तविक श्री स्वामी समर्थांपुढे या असल्या पदार्थाची दररोज रासच पडत असे त्यांना खरे तर साखरेच्या त्या बत्ताशाचे फारसे अप्रूपही नव्हते पण व्यवहारात काय किंवा परमार्थात काय असला विसराळूपणा अथवा गाफीलपणा घडू नये यावर त्यांचा कटाक्ष होता वामनबुवां सारख्या संस्कृत भाषा पंडिताकडून वेद उपनिषदे आदि शास्त्रांचा अभ्यास असलेल्याकडून तर अशी चूक मुळीच घडू नये अशी श्री स्वामींची अपेक्षा होती श्री स्वामींना त्यांच्या भक्ताकडून सेवेकर्यांकडून सदैव सतर्कता जागरुकता अपेक्षित असे विसर भोळेपणा गलथानपणा आणि आचार विचारातील शिथिलता विस्कळीतपणा अथवा गबाळेपणा त्यांना अजिबात मंजूर नव्हता मनाची स्थिरता कामातील एकाग्रता ही उपासनेबरोबरच कोणत्याही कामात त्यांना सदैव अपेक्षित असे निव्वळ पूजा अर्चा तीर्थयात्रा पारायण सोवळे इ.त्यांना मंजूर नव्हते वास्तविक वामनबुवा ब्रह्यचारी होते त्यांना कोणताही प्रापंचिक व्याप नव्हता त्यांनी ज्यांच्या दर्शनास जाण्याचे निश्चितच केले होते त्यांच्या प्रती मन पूर्णतया एकरुप एकाग्र आणि स्वस्थचित्त असावयास हवे होते सामान्य साध्या भोळ्या सेवेकर्यांचे एकवेळ ठीक पण वामनबुवांसारख्यांकडून हे विस्मरण तीर्थ यात्रेसाठी सदैव भटकंती ग्रंथवाचानाची आवड अनुष्ठाने कर्मकांड याचा सोस व त्यातील त्यांचा कर्मठपणा हे सर्व वामनबुवांनी सोडावे आपले प्राप्तव्य काय आपण करतो आहोत काय या सर्वांचा बोध बुवास व्हावा त्यासाठीच तर श्री स्वामींनी करुन दिलेले हे स्मरण.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments