क्र (१९२) माझा चोळ्या मला सोडून गेला

श्री स्वामी समर्थांनी चोळाप्पाचे भविष्य यापूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे मध्यान्ह रात्रीच्या समयास चोळाप्पास उपद्रव झाला चोळाप्पाच्या आग्रहाखातर श्री स्वामी समर्थ थोरल्या मणूरास परतले तेव्हा तेथे पटकीची साथ होती चोळाप्पा अत्यावस्थ होता श्री स्वामींनाही ताप भरला नंतर देशपांड्यांनी समर्थास त्यांच्या बैलगाडीतून अक्कलकोटास आणले इकडे चोळाप्पास अधिक त्रास होऊन तो शके १७९९ (इ.स.१८७७) अश्विन शुद्ध नवमीस इहलोक सोडून परलोकास गेला त्यादिवशी महाराजांस चैन न पडून त्यांची वृत्ती उदास झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील जीवन चरित्रात चोळाप्पाचे स्थान महत्त्वाचेच राहिले आहे इतके की चोळाप्पा ज्या दिवशी परलोकी गेला त्या दिवशी श्री स्वामींची वृत्ती अतिशय उदासीन झाली होती चोळाप्पाची संगत तुटली होती त्यामुळे त्यांना तो वियोग सहन होत नव्हता सात जन्माचा सांगाती गेला असे ते त्या दिवशी सर्वांनाच सांगत होते तो जरी त्यांचा सात जन्माचा सांगाती होता तरीही परमेश्वर स्वरुप असलेले श्री स्वामी त्याचे विधिलिखित बदलू शकत नव्हते शक्यतो परमेश्वर कुणाच्याही जन्म मृत्यूच्या क्रमात ढवळा ढवळ करीत नाहीत तसे केले तर जीवसृष्टीच्या अस्तित्वात मोठा गोंधळ निर्माण होईल चोळाप्पाला थोरल्या मणूरला परतण्याची घाई झाली होती तो श्री स्वामींस सारखा चला जाऊया चला जाऊ या असा म्हणत होता तेव्हा श्री स्वामींनी त्यास पहिली सूचना दिली चोळ्या मणूरच्या वाटेने काटे आहेत रे गाई गुरे घेऊन ये आपण दुसऱ्या वाटेने जाऊ पण त्यास समर्थ सूचेनाचा अर्थ कळला नाही दुसऱ्या दिवशीही मणूरच्या वाटेने जाण्याचा त्याचा आग्रह कायम होता वास्तविक चोळाप्पास श्री स्वामी समर्थ कोण आहेत हे चांगले ठाऊक होते त्यांचे गूढ वागणे बोलणेही त्याला समजायचे इतरांना तो अनेकदा श्री स्वामींच्या विशिष्ट कृतीचा संकेताचा अथवा बोलण्याचा उलगडा करुन सांगत असे त्याची स्वामीनिष्ठाही भक्कम होती परंतु या सर्वांवर त्याच्या प्रपंचातील मोह मायेचा पगडा वरचढ ठरला तो श्री स्वामींची सगुण भक्ती करीत होता परंतु त्यांची निर्गुण निराकार भक्ती म्हणजे काय त्या मार्गाने श्री स्वामींनी त्यास अनेकदा नेण्याचा प्रयत्न केला परंतु तो श्री स्वामींच्या सगुण भक्तितच अडकला झापडबंद पद्धतीने तो ती करीत राहिला परमेश्वराच्या सहवास व सेवेत विवेकानेच राहावे हे त्यास उमजले नव्हते श्री स्वामी त्याच्या आग्रहाखातर थोरल्या मणूरात आले देव जे नाही सांगायचे ते संकेत खुणांनी सांगतो दाखवतो भक्तास ते कळले तर ठीकच अन्यथा तो साक्षीभावाने बघतो यात ढवळा ढवळ करत नाही श्री स्वामींनी त्यास सांगितले होते त्या वाटेने काटे फार आहेत रे गाई गुरे घेऊन ये आपण दुसऱ्या वाटेने जाऊ परंतु मोह ममता मायेने माखलेल्या चोळाप्पाला त्याक्षणी तरी श्री स्वामींची ही सांकेतिक भाषा समजली नाही थोरल्या मणूरास पटकीच्या साथीचा जोर होता संध्याकाळी त्याला (पटकीने/महामारीने) धरले त्याला तापही खूप भरला परंतु दयाघन श्री स्वामींनी तो ताप स्वतःच्या अंगावर घेतला महामारीने होणारी त्याची तडफड श्री स्वामींना बघवेना श्री स्वामींना अक्कलकोटला आणण्यात आले दुसऱ्या दिवशी अश्विन शु.नवमी इ.स.१८७७ ला चोळाप्पाचे निधन झाले चोळाप्पा श्री स्वामींच्या दर्शनास त्याच्या अखेरच्या क्षणी मुकला पण बाळाप्पाने श्री स्वामींचे चरणतीर्थ अखेरच्या क्षणी चोळाप्पाच्या मुखात घातले ज्याची त्याची कर्मगती हा बोध यातून मिळतो.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments