क्र (२२७) दुर्जनांचे अन्न खाऊ नये

कोणी भक्तिमान गृहस्थाने नैवेद्य आणल्यास महाराज तो नैवेद्य ग्रहण करीत सुंदराबाई पैशाच्या लोभाने कोणाचाही नैवेद्य महाराजास खाऊ घाली महाराज तादात्म्य वृत्तीवर असले म्हणजे नैवेद्य खात देहावर आले म्हणजे तिला रागे भरत आणि म्हणत दुर्जनांचे अन्न खाऊ नये.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांकडे दर्शन मार्गदर्शन अथवा अन्य अनेक कारणांनी विविध प्रांतातले देशातले भागातले लोक येत असत त्यात नाना धर्म जाती पंथाचे लोक असत त्यांचे स्वभाव सवयी प्रवृत्ती व वृत्तीही भिन्न असत त्यात सज्जन दुर्जनही असत ते श्री स्वामींना विविध वस्तू फळे मिठाई नैवेद्य आदि अर्पण करीत सुंदराबाई मात्र पैशाच्या लोभाने कोणताही विधीनिषेध न पाळता कोणाचाही नैवेद्य महाराजांना खाऊ घालत असे महाराज तादत्म्य वृत्तीवर असल्यास तो नैवेद्य खात परंतु देहस्थितीवर आले की सुंदराबाईवर राग भरत आणि म्हणत दुर्जनांचे अन्न खाऊ नये दुर्जन हे कृतघ्न अविवेकी दुरवर्तनी असतात दुर्जनांच्या अन्ना वरही त्यांच्यासारखेच संस्कार झालेले असतात असे अन्न खाणार्यांची वृत्तीही अशीच कृतघ्नपणाची दुर्जनी माणसांसारखी होते म्हणून श्री स्वामींचा दुर्जनांचे अन्न खाऊ नये यावर कटाक्ष असे अन्न हे पूर्ण ब्रह्य आहे अन्न हे उदर भरणाचे केवळ साधन नाही म्हणूनच अन्न ग्रहण करण्याला यज्ञकर्म असे संबोधले आहे एखादा यज्ञविधी जेवढ्या भाव भक्तीने आणि आत्मियतेने केला जातो तेवढ्याच आत्मियतेने आणि भाव भक्तीने देवाला नैवेद्य दाखवला जावा तशाच स्वरुपाची अन्न ग्रहणाची म्हणजे जेवण्याची क्रिया असावी हा सुद्धा इथला आत्मबोध आहे संस्कारित मन वृत्ती याचाही परिणाम अन्नावर होत असतो सात्विक आहार तामस आहार याबद्दल विस्ताराने लिहिण्याची आवश्यकता नाही पण आहार सात्विक असावा असा आहार वृत्तीही तशीच बनवितो.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments