क्र (२४२) सुंठी वाचून खोकला गेला

लक्ष्मण पंडित हरिभाऊ तावडे आणि गजानन खत्री यांना श्री स्वामी समर्थांची आनंदमूर्ती पाहून परम समाधान वाटले रात्री तिघांचेही कपडे चोरीस गेले पुष्कळ तपास करुनही कपड्यांचा पत्ता लागेना दुसऱ्या दिवशी सकाळी श्री स्वामी समर्थांजवळ कपडे हरवल्याची फिर्याद केली त्यावर महाराज म्हणाले सुंठीवाचून खोकला गेला.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे सहाही षडरिपू आपापल्या परिने कार्यरत असतात ते त्यांचा प्रभाव वा परिणाम प्रसंगपरत्वे दाखवितात बहुतेक प्रापंचिक या षडरिपूंनी कमी अधिक प्रमाणात बाधित असतात त्या प्रमाणात त्याचे परिणाम ते भोगत असतात या षडरिपूंची तीव्रता कमी करण्यासाठीच तर विशुद्ध भक्ती आणि अध्यात्म आहे या षडरिपूंशी प्रयत्नपूर्वक लढल्यास जीवन निश्चितच आनंदी सुखी शांत समाधानी आणि प्रेमाने परिपूर्ण होऊ शकते त्यासाठी ज्ञानोबांपासून तर तुकोबांपर्यंत सर्वच संतांनी सांगितलेला भक्ती योग चिंतनीय मननीय आणि आचरणीय आहे यात कालबाह्य कर्मकांडे सोवळे ओवळे अनुष्ठाने तीर्थयात्रा यास स्थान नाही नसते नसावे हे लक्षात असू द्यावे विशुद्ध भक्तीने जीवनात तृप्ती साधते परंतु षडरिपू लिप्ततेने जीवनाचे अधःपतन ठरलेले असते षडरिपूं पैकी काम क्रोध लोभ मद आणि मत्सर हे पाच विकार ठळक ठसठशीत असतात मोह हा विकार सूक्ष्म असतो मोहाला हद्दपार करणे भल्या भल्या साधक उपासक भक्तांना जमत नाही त्यासाठी विवेकाने प्रयत्न करावे लागतात मोहाच्या हद्दपारीशिवाय साधनेची वाट निष्कलंक निर्वेध होत नाही हाच महत्त्वाचा धडा हरिभाऊ तावडे गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित या तिघांना श्री स्वामींनी त्यांचे कपडे चोरीला जाण्याच्या घटनेतून करुन दिला या तिघांनाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव दोन हजाराचा नफा होऊन आला होता पण त्यांच्या मनातून मोहाचे समूळ उच्चाटन झाले नव्हते तसे झाले असते तर कपडे चोरीला गेल्याचे दुःख त्यांना झाले नसते ते अद्यापही मोहाला पूर्णतः तडीपार करु शकले नव्हते त्यांच्या मनात थोडा का होईना मोह शिल्लक होताच कारण त्यांचे कपडे चोरीस गेल्यावर ते मनातून हळहळले त्या चोरीस गेलेल्या कपड्यांचा त्यांनी शोधही भरपूर घेतला दुसऱ्या दिवशी श्री स्वामींकडेही त्याबाबत कथन केले श्री स्वामी दर्शनाचा त्यांच्या कृपेचा त्यांना परम आनंद झाला हे वास्तव येथे दिसते प्रपंचाविषयी त्यांच्या मनात अरुची निर्माण झाली होती श्री स्वामींच्या दर्शनाने त्यांच्या मनात विरक्तीचा विचारही दृढ झाला होता पण क्षुल्लकसा का होईना मोह त्यांच्या चित्तात टिकून असल्याचे श्री स्वामींनी जाणले होते म्हणून तर रात्री त्यांचे कपडे चोरीस जाण्याची कृती त्यांनी घडवून आणली त्यांना त्याची रुखरुख लागली त्याबद्दल ते श्री स्वामींजवळ बोलताच श्री स्वामी म्हणाले बरे झाले सुंठीवाचून खोकला गेला त्या तिघांच्याही डोक्यात या श्री स्वामी उदगाराने प्रकाश पडला आपण संसार प्रपंच सोडण्याच्या विरक्तीच्या गोष्टी करतो पण साधे कपडे चोरीस गेले तरी हळहळतो त्यांचा तपास करण्याचा प्रयत्न करतो आणि महाराजांनाही त्याबद्दल सांगतो मग प्रपंच कसा सोडणार विरक्ती कशी येणार मनातल्या कोणत्याही लहान मोठ्या क्षुल्लकातल्या क्षुल्लक मोहाचाही त्याग केला तरच उपासना मार्ग निर्विघ्न होईल हे त्या तिघांनीही जाणले या तिघांच्या भूमिकेत शिरुन आपणास मोहाबाबत काही शिकता येईल का तसे झाले तर आपला श्री स्वामी समर्थां विषयीचा काय किंवा अन्य देवदेवता विषयीचा उपासना मार्ग निश्चितच फलदायी होईल.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments