क्र (२६७) हम गया नही जिंदा है

महाराजांनी एकदा निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारास शनिवारी येऊ जा (बखर १९६) असे सांगितले होते पण निलेगावाला जाण्यापूर्वीच श्री स्वामींचे महानिर्वाण झाले होते (३० एप्रिल इ.स.१८७८ शके १८००) तो दिवस होता मंगळवार त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे शनिवारी निलेगावच्या वेशी बाहेर एका वृक्षाखाली महाराज सेवेकर्यांसह आले हे वृत्त समजताच भाऊसाहेब त्यांचे कुटुंबिय गणगोत आप्त स्नेही यांच्यासह तेथे आले तेथे त्यांनी श्री स्वामींची पूजा केली त्यांना घरी येण्याविषयी आग्रहाची व अगत्याची विनंती केली होती (तो दिवस होता शनिवार) पण श्री स्वामींनी आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येऊ असे वचन दिले रात्र झाल्याने सर्व मंडळी घरी परतली भोजन आटोपून परत सर्व मंडळी महाराज जेथे उतरले होते त्या वृक्षाखाली आली तो काय महाराज तेथे नव्हते सेवेकरीही नव्हते भाऊसाहेबांनी खूप शोधले अखेर निराश होऊन ते घरी परत आले श्री स्वामींनी दुसरे दिवशी म्हणजे रविवारी येण्याचे वचन दिले होते म्हणून स्वागताची सर्व तयारी करुन महाराजांची येण्याची वाट पाहू लागले अकस्मात महाराज सर्वांसमोर येऊन उभे राहिले त्यांना भोजनासाठी विनविले पण एकही शब्द न बोलता ते जसे आले तसे अकस्मात दिसेनासे झाले महाराजांचा शोध घेण्यास भाऊसाहेबांनी चौफेर माणसे धाडली त्यापैकी काही अक्कलकोटापर्यंत जाऊन आली तेव्हा महाराज चार दिवसांपूर्वीच म्हणजे मंगळवारी समाधिस्त झाल्याची त्यांनी  बातमी आणली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

हम गया नही जिंदा है या श्री स्वामी समर्थ वचनाची प्रचिती आणून देणारी ही एक लीला आहे त्यांनी मंगळवार चैत्र वद्य त्रयोदशी १३ शके १८०० म्हणजे ३० एप्रिल इ.स.१८७८ मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली या दिवसापर्यंत देहधारी स्वरुपात रात्रंदिवस बहुजन सुखाय बहुजन हितायसाठी वावरणारे हे चालते बोलते परब्रम्ह समाधिस्त झाले परंतु निलेगावच्या भाऊसाहेबास वचन दिल्याप्रमाणे ते शनिवारी अकस्मात आले दिलेल्या वचनाची पूर्ती केली पण त्यानंतरही निर्गुण निराकार चैतन्य स्वरुपात श्री स्वामी समर्थ त्यांच्या शेकडो भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही कार्यरत असल्याची खात्री देतात याची बरीच उदाहरणे आहेत ही सर्व उदाहरणे आपणास काय प्रबोधित करतात मैं गया नही जिंदा है या त्यांच्या अभिवचनाचा मथितार्थ समजावून घेतल्यावर तुम्हा आम्हा कुणासही दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असेच मनोमनी म्हणून नकळत श्री स्वामी समर्थांप्रती कर जुळतात.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments