क्र (२०१) दंड कोठे आहे

गोविंदबुवा नाशिककर स्वामी आणि काही मंडळी श्री स्वामी जेथे वटवृक्षाखाली होते तेथे आले गोविंदबुवांनी तेथे कीर्तन केले महाराजांनी त्यास बसण्याची आज्ञा केली आणि समर्थ म्हणाले दंड कोठे आहे हे ऐकून गोविंदस्वामींनी उत्तर दिले मनोवाक्काय हे दंड परमहंसास प्राप्त झाले म्हणजे बाह्यकाष्ठदंडाचा त्याग होतो कोणतीच अपेक्षा राहत नाही व्यवहार परमार्थ अभेद ऐक्य झाला आहे तथापि विनयपूर्वक प्रार्थना इतकीच आहे की आमचेकडील भिक्षा कृपा करुन अवश्य ग्रहण केली पाहिजे हे ऐकून श्रीमत् गुरुदेव पोट धरून हसत हसत व काही शब्दसंकेत देऊन रागाने बोलले की तुमच्याकडे संन्याशास घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो नसल्यास भिक्षा कुठे कोणी करावी बरे आहे मग या असे म्हणून उगीच राहिले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या कथा भागात ज्यांचा उल्लेख आलेला आहे ते गोविंदबुवा नाशिककर स्वामी विद्वान आणि चांगले पट्टीचे किर्तनकार होते त्यांनी श्री स्वामी महाराजांपुढे कीर्तन केले त्यांची योग्य ती कदर करण्यासाठी श्री स्वामींनी त्यांना स्वतःजवळ बसवून घेतले दंड कोठे आहे या श्री समर्थांच्या प्रश्नास गोविंदस्वामींनी दिलेले उत्तर मनोवाक्काय केली पाहिजे लीला भागामध्ये आलेले मूळातच पूर्णतः वाचून त्या दोघांमधील प्रश्नोत्तराचा खोलवर विचार केल्यास त्याला अनेक पदर सापडतात १ गोविंदस्वामींचा आचार विचार कसा आहे हे पारखून पाहावे असे श्री स्वामींना वाटले असावे २ श्री स्वामींना जर संन्यासी मानले जात होते तर दंड त्यांच्याकडे असावयास पाहिजे होता संन्यासी आणि दंड हा अविभाज्य भाग असतानाही तो श्री स्वामींकडे नव्हता याबाबत गोविंदस्वामींना काय म्हणावयाचे आहे अथवा त्यांचे काय मत आहे हे श्री स्वामींना जाणून घ्यायचे होते श्री स्वामी समर्थ हे परमहंस अवधूत होते त्यांना दंड कथा भस्म कमंडलू भगवी वस्त्रे आदींची आवश्यकता नव्हती कारण या अवस्थेत ज्ञान हाच दंड समता हीच कथा वैराग्य हेच भस्म आणि तत्त्व विवेचन हाच कमंडलू असतो मनाने शरीराने आणि वाणीने परमशुद्धी झालेली असते ब्रह्यज्ञानही आत्मसात झालेले असते त्यामुळे बाह्यत काष्ठदंडाची आवश्यकताच नसते हे गोविंदस्वामी महाराजांबाबत जाणून होते पण नंतरची गोविंद स्वामींची श्री स्वामी समर्थांस विनवणी आमचेकडील भिक्षा कृपा करुन अवश्य ग्रहण केली पाहिजे यावर श्री स्वामींचा पोट धरून हसण्याचा अर्थ भावार्थ मथितार्थ काय भिक्षा भोजनासाठी घर दार आश्रम भांडी कुंडी अन्न धान्य आदींचा संग्रह करावाच लागतो असा संग्रह करणे हे यती (संन्यासी) धर्मास सोडून आहे हे स्वामींना येथे निर्देशित करावयाचे आहे परमहंसाला ज्ञानामृत हे भोजन जमीन ही शय्या आणि दिशा हे वस्त्रप्रावरण असतात श्री स्वामींचे प्रश्न संन्याशास (यतीस) घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो नसल्यास भिक्षा कुठे कोणी करावी असे प्रश्न गोविंद स्वामींपुढे त्यांनी टाकले त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करीत बरे आहे मग या असे म्हणून त्यास निरोप दिला या लीलाभागात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे गोविंदस्वामींबद्दल महाराजांस असलेला आदर आणि प्रेम म्हणून तर त्यांचे कीर्तन त्यांनी ऐकून त्यांना जवळ बसवून घेतले त्यांच्या विद्वत्तापूर्ण बोलण्यातही नम्रता होती म्हणून ते हसले त्यांच्या चिकित्सक बुद्धीला विचार करावयास लावणारे प्रश्न विचारुन त्यांना बरे आहे मग या असा प्रेमाने निरोप दिला या दोघांमधील प्रश्नोत्तरे निश्चितच मननीय आहेत संन्यास धर्माची व्याप्ती आचार विचार आणि व्यवहार व्यक्त करणारी आहे जटा भस्म दण्ड कमंडलू भगवी वस्त्रे आदी धारण करणारे संन्यासी असतातच असे नाही जी श्री स्वामी समर्थांच्या असंख्य लीलातून जाणवते व आपणा सर्वांस प्रबोधित करते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments