क्र (२२४) काय रे तुला त्यांच्या गावास जायचे आहे काय

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला येणाऱ्या यात्रेकरुशी बाळाप्पा बोलत बसत असेच एकदा बाळाप्पाने एक दिवस एका यात्रेकरू बरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या ते ऐकून महाराजांनी बाळाप्पास फटकारले काय रे मादरचोदा त्याच्या गावास तुला जायचे आहे काय बाळाप्पास त्याची चूक समजताच त्याने आपले दोन्ही कान उपटून घेतले आणि महाराजांची क्षमा मागितली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांचे कार्य पुढे चालविण्याचे काम बाळाप्पा महाराजांनी केले पण सुरुवातीस ते श्री स्वामींच्या सेवेत आले तेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या ते परिपक्व नव्हते त्यामुळे श्री स्वामी समर्थांकडे दर्शन मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या बहुतांशी यात्रेकरुंशी ते बोलत बसत तसे तेव्हा ते पोरसवदा बाळाप्पा म्हणून होते बाळाप्पा तेथे येणाऱ्या यात्रेकरुंच्या अनावश्यक चौकशा करीत असे श्री स्वामींना बाळाप्पाची निष्ठा सेवा भक्ती सारे काही ज्ञात होते परंतु तरीही त्याच्यात वायफळ गप्पा टप्पा मारण्याची चांभार चौकशा करण्याची जी सवय होती ती श्री स्वामींना अर्थातच खटकत होती असेच एकदा बाळाप्पा यात्रेकरुशी इकडच्या तिकडच्या अनावश्यक गोष्टी करताना श्री स्वामींनी त्यास पाहिले आणि त्यास काय रे मादरचोदा तुला त्यांच्या गावास जावयाचे आहे काय अशा कडक शब्दांत फटकारले अध्यात्मात काय किंवा परमार्थात काय अशा प्रकारच्या गप्पा गोष्टीस अजिबात स्थान नसते तसे ते नसावे त्याच प्रमाणे स्वतःचा उद्योग व्यवसाय नोकरी करणाऱ्यांनीही अशा गोष्टीस फारसे स्थान देऊ नये मन अधिकाधिक शांत करुन परमेश्वराच्या नामस्मरणात चिंतनात अथवा स्वीकृत कामात ते गुंतवावयाचे असते बाळाप्पाच्या या सवयीमुळे त्यांनी त्यास वरील शब्दात फटकारल्यावर त्याला त्याची चूक लक्षात आली त्याने स्वतःचे कान उपटून श्री स्वामी समर्थांसमोर क्षमा मागितली यातूनच पुढे बाळाप्पा श्री स्वामींच्या देखरेखीखाली आणि वेळोवेळीच्या मार्गदर्शनाखाली घडत जाऊन श्री स्वामींच्या उत्तराधिकारी पदाच्या स्थितीला पोहचले याच बाळाप्पाचा बाळाप्पामहाराज म्हणून पुढे नाव लौकिक झाला यातून आपणसुद्धा धार्मिक स्थळा वरील अनावश्यक गप्पा गोष्टी कृती करताना श्री स्वामी आपणाससुद्धा बाळाप्पा सारखेच फटकारीत आहेत असे समजून वा कल्पना करुन आपले वर्तन सुधारावे येथेही लीला वा चमत्कार नाही परंतु तुम्हा आम्हास मौलिक उपदेश मात्र आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments