क्र (२१०) श्री स्वामी समर्थांचे सदेह दर्शन

सातारा जिल्ह्यातील राहणाऱ्या श्री स्वामी समर्थ भक्त पांडुरंग केशव नावाच्या गृहस्थास तो मरण्याचा दोन दिवसापूर्वी महाराजांचे साक्षात दर्शन झाले तो कधी कधी अक्कलकोटला येत असे मुंबईहून आलेल्या बाले मंडळीच्या यात्रेत लख्या नावाचा पोर्या होता त्यास ब्रह्यचारी बुवांनी (नैवेद्यासाठी) बाजारातून गूळ आणावयास सांगितले लख्या गूळ घेऊन येत असता वाटेत तो खाऊ लागला तो इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले की लखा भोसडीका गूळ खाता माकु देता नही असे म्हणून हूँ हूँ हूँ रडू लागले हा तमाशा पाहून काही मंडळी बाजाराकडे गेली तो तिकडून लख्या गूळ खात येत असतानायांच्या दृष्टीस पडला तेव्हा त्यांना श्री स्वामींच्या या लीलेचे मोठे आश्चर्य वाटले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीला भागात श्री स्वामी समर्थ भक्त पांडुरंग केशव हा साध्या भोळ्या सरळ मनाने कधी कधी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी जात असे तो श्री स्वामींकडे काही मागत असल्याचा त्यांना नवससायास करीत असल्याचा उल्लेख येथे नाही म्हणजेच पांडुरंग केशव निर्मोही निर्लेप भाव भक्तीने निरपेक्ष बुद्धीने केवळ श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठीच जात असे सर्वव्यापी ब्रह्यांडनायक आंतर्ज्ञानी श्री स्वामी समर्थांना त्याची भक्ती का कळली नसेल निश्चितच कळत असेल तशी तुमची आमचीही त्यांना कळू शकते म्हणून श्री स्वामींनी त्याच्या मृत्यूपूर्वी दोन दिवस अगोदर त्याला साक्षात सदेह दर्शन दिले प्रत्यक्ष परब्रह्याचे दर्शन यापेक्षा जीवनात अजून काय हवे हेच अनेकांना कळत नसल्यामुळे किंवा कळत असूनही वळत नसल्यामुळे ते देवाकडे सतत देवघेवीचा व्यवहार करीत असतात देवा तू मला अमुक तमुक दे माझी अशी अशी मनोकामना पुरी कर म्हणजे मी हे पारायण हे अनुष्ठान अमुक एखादी पूजा अथवा काही अर्पण करीन असे बरेच काही कबुल करीत असतो असला हा देवघेवीचा सौदा करण्यातच उपासकाचे अवघे अवधान आणि मन गुंतलेले असते परमेश्वराशी अनुसंधान तुटलेले असते या सर्वांतून निखळ शुद्ध निर्मोही भक्ती कशी व्हावी आपली कृती पांडुरंग केशव सारखी असावी बाकी सर्वकाही श्री स्वामी समर्थांना कळते हा इथला मथितार्थ आहे मुंबईहून ब्रह्यचारी बुवांबरोबर काही बालेमंडळींची यात्रा श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी अक्कलकोटला आली ही बालेमंडळी बाणकोट (कोकण) भागातील होती ते बहुधा अशिक्षित अडाणी आणि साधी सुधी होती त्यांच्यातच लख्या नावाचा एक अडाणी अशिक्षित पोर्या होता साधारणत अज्ञानी  अडाणी जीव साधे सुधे देव भोळे असतात सण यात्रा देवदेवतांचे उत्सव करुन देवदेवतांस प्रसन्न करण्याचा त्यांचा साधा सरळसरधोपट भाबडा खाटाटोप असतो अशा प्रकारे देव देवतांना खुश केले की प्रपंचात जीवनात कशाची म्हणून उणीव भासत नाही असे त्यांना सरळ सरळ वाटते त्यातील ब्रह्यचारीबुवांनी लख्या पोर्यास नैवेद्यासाठी बाजारातून गूळ आणावयास पाठवले परंतु त्याने आणलेला गूळ तोच वाटेत खाऊ लागला आंतरसाक्षी श्री स्वामी समर्थांनी लगेच लखा भोसडीच्या गूळ खाता माकू देता नही असे म्हणून हू हू हू करु लागले या घटनेचा अर्थ भावार्थ मथितार्थ शोधू गेल्यास असे लक्षात येते की देव देवतेच्या नैवेद्यासाठी आणलेली वस्तू नैवेद्य दाखवण्यापूर्वी उष्टावणे अथवा खाणे अप्रशस्त आणि चुकीचे असते हेच अनेकदा अनेकांना उमजत नाही समजत नाही नैवेद्य दाखवल्या नंतरच प्रसाद म्हणून तो खावयाचा असतो हे दर्शविण्यासाठीच श्री स्वामींनी उघडपणे सर्वांसमोर बाले लोकांच्या भाषेतच बोलून रडण्याचे नाटक केले श्री स्वामी त्यांची भाषा केव्हा शिकले हे सारेच अगम्य पण स्वामींना काय अशक्य त्या यात्रेत आलेले ब्रह्यचारीबुवा मुमुक्षू आहेत त्यांच्याबरोबर आलेली अन्य यात्रेकरू मंडळी साधी भोळी भक्ती करणारी प्रापंचिक आहेत चोरुन गूळ खातो माका देत नाय म्हणजे देवाची भक्ती निःस्वार्थ चोरुन मारुन खाबूगिरी न करता व्हावी असेच त्यांना सूचित करावयाचे आहे देव पाहत नाही असे समजून काहीही करु नये हा श्री स्वामींनी दिलेला संकेत आहे भक्तीतला निखळपणा पूर्णतः जीव ओतून कोणत्याही प्रकारे न उष्टवता भ्रष्टवता व्हावी हाच यातला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments