क्र (२५२) आला तर बरे नाहीतर झोपडी उडवून लावतो

महाराज स्वामीसुतास चंदुलाल म्हणत पुष्कळ लोकांस मनोकामना सिद्धयर्थ दर्याकिनार्यावर जा म्हणजे मुंबईस स्वामीसुताकडे जाण्याची ते आज्ञा देत तेथे समर्थांचे कृपादृष्टीने लोकांचे हेतू पूर्ण होत अशी चार वर्षे स्वामीसुताची भरभराट झाली त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीस हजारो लोकांना लावले एकदा स्वामीसुत अक्कलकोटला आले असता आपण लवकर अवतार संपविणार आणि तू पुढे ध्वज उभारावा असे स्वामीमहाराज स्वामीसुतास म्हटल्यावर त्यांना अत्यंत वाईट वाटले व बापाचे आधीच आपण प्रयाण करावे असा त्यांनी निश्चय केला पुढे स्वामीसुताची प्रकृती बिघडली श्री स्वामींनी त्यास अक्कलकोटी आणण्याची शिकस्त केली पण स्वामीसुत आले नाही महाराजांनी त्यास अखेरचा निरोप पाठविला की तोफ लावून तयारी करुन ठेविली आहे आला तर बरे नाहीतर झोपडी उडवून लावतो परंतु स्वामीसुत मरणाला घाबरले नाहीत.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

महाराज आणि स्वामीसुत यांच्यातील नाते महाराजांची स्वामीसुतावरील कृपादृष्टी स्वामीसुतांचीही स्वामीनिष्ठा त्यासाठी लागणारी व श्री स्वामींना अपेक्षित असलेली निस्पृहता स्वामीसुतात ओतप्रोत भरलेली होती स्वामीसुतांनी महाराजांअगोदर जाण्याचा मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय का घेतला मृत्यूलाही थोपविणारे श्री स्वामी महाराज यांनी स्वामीसुतास अक्कलकोटला आणण्याची पराकाष्ठा करुनही ते का आले नाहीत असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल श्री स्वामींवर त्यांची निष्ठा व पितृवत् प्रेम होते हे सर्वश्रुत आहे आपण लवकरच अवतार संपविणार आहोत आणि तू पुढे ध्वज उभारावा श्री स्वामींच्या या उदगाराने स्वामीसुतास वाटले असावे की आपण आपल्या प्राणप्रिय पित्याचा मृत्यू त्यांचे या जगातून सदेह जाणे सहन करु शकणार नाही म्हणून त्यांनी श्री स्वामींच्या अगोदर मृत्यूला जवळ करण्याचा निश्चय केला असावा श्री स्वामींपुढे जाऊन आपण आपला मनोभाव कथन करु शकणार नाही म्हणूनही ते अक्कलकोटला आले नसावेत श्री स्वामींची गादी त्यांचा ध्वज उभारण्याची संधी आदि पेक्षाही त्यांना श्री स्वामी समर्थांचे या जगात अजून काही दिवस राहणे महत्त्वाचे वाटत होते स्वामीसुत अक्कलकोटला आले असते तर लीलाधर श्री स्वामींनी अशी काही लीला अथवा किमया करुन स्वामीसुतास जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले असते पण स्वामीसुतास श्री स्वामींशिवाय अन्य कशातही स्वारस्य नव्हते श्री स्वामी समर्थ की स्वतःचा मृत्यू स्वामीसुतांनी मृत्यूस जवळ केले पराकोटीची गुरुभक्ती ती हीच गुरुभक्तीत पूर्णतः विरघळून जाणे याचे हे उत्तम उदाहरण असल्याचा बोध होतो (अर्थात गुरुही तेवढेच सामर्थ्यशाली निःस्पृह विरक्त होते)

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments