क्र (४७) बाळाप्पास श्री स्वामी समर्थ नामजपाचा संकेत

एकदा बाळाप्पा प्रातःकाळी चार वाजताच माळ घेऊन गणपती चा जप करीत बसला तेव्हा स्वामी समर्थ पलंगावर बसलेले होते शिवुबाई सेवेकरी खाली बसली होती इतर इकडच्या तिकडच्या गोष्टी चालल्या असताना शिवुबाईने श्री स्वामींना विचारले हल्ली बाळाप्पा काय करीत आहे त्यावर श्री स्वामी उत्तरले तो तरट विणत आहे हे ऐकून शिवुबाई शांत बसली श्री स्वामींचे तरट विणण्याचे उत्तर ऐकून बाळाप्पाने मनात विचार केला तरटाचा विशेष उपयोग होत नाही त्या अर्थी गणपतीच्या जपापेक्षा श्री स्वामी समर्थांचा जप करावा दुसरे दिवशी बाळाप्पा श्री स्वामींचा जप करु लागला शिवुबाई पुन्हा श्री स्वामींस पूर्वीचा प्रश्न केला आज बाळाप्पा काय करीत आहे त्यावर स्वामी समर्थ उत्तरले आज तो कांबळी विणत आहे बाळाप्पाने श्री स्वामींचे उत्तर ऐकून विचार केला की तरटापेक्षा कांबळीचा उपयोग जास्त आहे तेव्हा सर्वकाळ श्री स्वामी समर्थ नामाचाच जप करावा .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

बाळाप्पा श्री स्वामी समर्थांच्या निकट सहवासात आणि सेवेत होता बाळाप्पाचा गुरुचा शोध श्री स्वामी समर्थांपाशी थांबला होता पण गुरुपाशी तो अद्यापपावेतो एकरुप झालेला नव्हता त्याच्या मनात अजूनही थोडाफार किंतु परंतु होता गुरुरुपाची अमूर्त कल्पना अद्यापही त्याच्या पचनी पडली नव्हती म्हणून तर तो सुरुवातीस गणपतीचा जप करीत होता मी सेवाधारी ही स्व ची कल्पना त्याच्या मनातून जात नव्हती हा गणपती तो विष्णू हा शंकर तो राम ती देवी अशी रुपे तो मानीत होता प्रत्यक्ष अष्टौप्रहर श्री स्वामी समर्थांसारखा परब्रम्हाच्या निकट सहवासात राहूनही परमेश्वराबाबतचे हे व्दैतस्वरुप त्याच्या मनातून गेले नव्हते श्री स्वामींना बाळाप्पास सगुण उपासनेकडून निर्गुण उपासनकडे न्यावयाचे होते लीलेतील बोध अगदी साधा सोपा सरळ आहे साधकाला आपल्या गुरुच्या श्रेष्ठत्वाची सामर्थ्याची प्रचिती आल्यानंतर त्यांच्या चरणी सर्व निष्ठा वाहून त्यांच्याच सेवेत रत राहणे केव्हाही उत्तम लीलेतील तरट सगुण उपासनेची प्राथमिक अवस्था आहे तर कांबळ निर्गुण निराकार उपासनेतील प्रतीक आहे श्री स्वामींच्या निर्गुण उपासनेत रत व्हावे हेच येथे बोधित करावयाचे आहे या लीलेतील शिवुबाई येथे फक्त निमित्तमात्र आहे इतकेच .

श्री स्वामी समर्थ 

Post a Comment

0 Comments