क्र (८८) श्री स्वामी समर्थांनी नवस फेडून घेतला

शेअर बाजारात एका ब्राम्हणास खूप फायदा झाला परंतु त्यास संतती नव्हती म्हणून उभयतांनी गाणगापुरास जाऊन दत्तप्रभूचे दर्शन घेऊन नवस केला की आपल्या कृपेने आम्हाला पुत्रलाभ झाल्यास सहस्त्रभोजन घालू पुढे एका वर्षभरातच त्यास पुत्र झाला पण शेअरबाजार गडबडल्याने त्याचे दिवाळे निघाले अब्र् गेली काही दिवसांनी तोही मरण पावला आता नवस कसा फेडावा याचा घोर त्याच्या बायकोला लागला पुढे एका सात्त्विक बाईने तिला उपदेश केला की तू गाणगापुरास जाऊन पुत्रासह वर्तमान श्री गुरू दत्तात्रेयाची सेवा कर ते आपला नवस फेडून घेतील तिने तसे करताच एके रात्री तिला तू अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांना जेवू घाल म्हणजे तुझा नवस फिटेल असा दृष्टांत झाला दुसरे दिवशी सकाळी ती बाई दृष्टांताप्रमाणे अक्कलकोटला गेली श्री स्वामी समर्थांचे दुरुनच दर्शन घेऊन हात जोडून त्यांच्या समोर उभी राहिली श्री स्वामी महाराजांनी तिला जवळ बोलावून म्हटले अगं आम्हास जेवू घाल त्यानुसार बाईने नैवेद्याची तयारी करुन ताट वाढून आणले श्री स्वामी महाराजांनी यथेच्छ भोजन करुन पोटावर हात फिरवित ढेकर देऊन म्हटले तुझे सहस्त्रभोजन झाले बरे जा आता हे ऐकून त्या बाईला अतिशय आनंद वाटला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील ब्राम्हणास दत्तप्रभूंच्या कृपेने पुत्र झाला परंतु पुढे कालचक्रच असे फिरले की सहस्त्रभोजन घालावयाचा नवस राहून गेला याची बोच खंत त्याच्या बायकोला लागून राहिली गाणगापूरचे दत्तप्रभू आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे एकच आहेत हे ही या कथेवरुन स्पष्टपणे बोधित होते कारण तिला अक्कलकोटला जाऊन नवस फेडण्याचा निर्देश झाला तिने त्याप्रमाणे करताच श्री स्वामी महाराज म्हणाले तुझे सहस्त्रभोजन झाले बरे जा आता या सर्व घटनांवरुन दत्तप्रभू आणि श्री स्वामी समर्थ एकच असल्याचे स्पष्ट होते सदेह स्वरुपात अक्कलकोट आणि अक्कलकोट परिसरात वावरणारा श्री स्वामींचा हा दैवी अवतार कोणत्या का निमित्ताने कोणी कोठेही असला तरी त्याची तिची काहीही कामना असली तरी ती ते खुषीने पूर्ण करीत जशी या लीलाकथेतील त्या स्त्रिची नवस फेडून घेण्याची कामना पूर्ण करुन घेतली तशी आपल्या निष्काम निर्मोही सेवेने श्री स्वामी समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळवून तृप्तीचे समाधानाचे ढेकर कसे देता येतील हाच यातला मुख्य बोध घेता येईल.

श्री स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments