क्र (८१) मैंदर्गीच्या मुसलमान जमादाराची गोष्ट

मैंदर्गी गावी एक मुसलमान जमादार तुरुंगाधिकारी होता तुरुंगातील कैद्यांवर देखरेख करण्याचे काम त्याच्याकडे होते एके दिवशी सायंकाळी एक कैदी त्या जमादाराची नजर चुकवून पळून जाणेकरिता कोर्टाच्या खंदकात लपून बसला कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले झालेल्या अपराधाची तोहमत येऊन शिक्षा होईल याची त्यास काळजी वाटून फारच वाईट लागले त्याचे आता म्हातारपण झाले होते पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असता त्याच्या ताब्यातील कैदी जाण्याच्या या घटनेने त्यास पराकाष्ठेचे दुःख झाले हा मुस्लिम जमादार श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता त्याने श्री स्वामींचे मनोमन स्मरण करुन प्रार्थना केली की तुरुंगातून पळालेला कैदी सापडून आपल्यावर आलेले दूषण (तोहमत) टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामी समर्थांची सेवा करीन रात्री इकडे तिकडे पळून गेलेल्या कैद्याचा तपास केला पण पत्ता काही लागला नाही उजाडल्यावर एक स्वार कैद्यांच्या तपासात फिरत असता त्यास खंदकात लपून बसलेला एक कैदी सापडला त्यास जमादाराच्या स्वाधीन करण्यात आले जमादारास अत्यानंद झाला त्याने सापडलेल्या कैद्यास मामलेदाराच्या स्वाधीन केले आणि नोकरीचा राजीनामाही त्यांचे स्वाधीन केला लपून बसलेला कैदी रात्रभर कसा राहिला याचे मामलेदारास आश्चर्य वाटून त्याने कैद्याची विचारपूस करता त्यांने सांगितले की पळून जाण्याकरिता खंदकाभोवती रात्रभर आपण फिरलो खंदकावर चढून जावे तर एक संन्याशी आपणास मारण्यास येई तो संन्याशी सकाळपावेतो आपल्या मागे फिरतच होता सकाळी स्वाराने येऊन आपणास पकडले कैद्याने सांगितलेली ही हकीकत ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेतील मुस्लिम जमादाराची श्री स्वामी समर्थांवर अपार श्रध्दा होती एकदा त्याच्या ताब्यातील एक कैदी पळून गेल्यामुळे म्हातारपणी पेन्शन मिळण्याचा कालावधी जवळ आला असताना त्याच्यावर तोहमत दूषण आली होती पळून गेलेला कैदी सापडल्यास म्हणजे त्याच्यावर येणारी तोहमत दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन त्याने फक्त आणि फक्त श्री स्वामींचीच सेवा चाकरी करण्याचा निश्चय केला कैदी सापडला केलेल्या निर्धाराप्रमाणे जमादाराने त्याच्या नोकरीचा राजीनामाही दिला निश्चयाप्रमाणे वागण्याचा निर्धार केला या लीलेत पळून जाऊ पाहणाऱ्या कैद्याने सांगितलेले मनोगत निश्चितच मननीय आहे श्री स्वामी समर्थ खरोखरच भक्तांचे रक्षणकर्ते संकट विमोचक आहेत संन्याशाच्या वेषात वावरुन पळणार्या कैद्यास त्यांनी रोखले भक्तावर येणारी तोहमत टाळली भक्तांसाठी किती खस्ता खाण्याची त्यांची तयारी आजही श्री स्वामी समर्थ कळत नकळत त्यांच्या भक्तांस मदत करीत असतात म्हणूनच त्यांचा भक्ताभिमानी भक्तवत्सल आसा जो गौरव जातो हाच मुस्लिम जमादाराच्या लीलेतील अर्थबोध आहे .

श्री स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments