क्र (१४९) तीन दिवस रताळी भाजून खा

दम्याचा उपद्रव असलेल्या एका ब्राम्हणाने श्री स्वामी समर्थांस विचारले महाराज या दम्याने फार बेजार केले आहे अगदी चैन पडत नाही काही तरी औषध सांगा त्यावर श्री गुरू समर्थ म्हणाले रताळी भाजून खा त्याने तीन दिवस रताळी भाजून खाताच त्याचा दमा निःशेष बरा झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

दम्याच्या उपद्रवाने त्रस्त झालेला ब्राम्हण तुमच्या आमच्यासारखाच सर्वसामान्य सांसारिक माणूस आहे दीडशे वर्षांपूर्वी वैद्यकिय सुविधा आजच्या इतक्या प्रगत नव्हत्या जडीबुटी चाटण देणारे काही वैद्य होते  त्यांचेही उपचार करुन झाले होते पण गुण काही येईना शेवटी त्याला श्री स्वामी समर्थ हाच एकमेव आधारवड वाटला श्री स्वामींनी त्यास दम्यावर रताळी तीन दिवस भाजून खा असे सांगितले हा उपचार करताच दमा निःशेष बरा झाला सध्याच्या दम्याच्या विकाराने आजारी असलेल्यांनी हा उपचार केला तर गुण येईल का शक्यता फारच कमी जवळ जवळ नाहीच सर्वसाक्षी परब्रम्ह श्री स्वामी समर्थांनी स्वमुखाने सांगितलेला तो उपचार होता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेल्या श्री स्वामींच्या मुखातून जे शब्द बाहेर पडत तेच औषध असे या औषधाचा मथितार्थ भावार्थ शोधू गेल्यास श्री स्वामींनी हे औषध तीन दिवस घ्यावयास सांगितले कारण १)अतीत म्हणजे पूर्व भूतकाळातले दम्याने त्रस्त असलेल्या त्या ब्राम्हणावर भूतकाळात झालेले संस्कार २)विद्यमान म्हणजे वर्तमान काळात त्याच्या अज्ञानवश कर्मातून घडलेले ज्ञान ३)अनागत म्हणजे भविष्यकाळातील रचलेले कल्पनेचे मनोरे थोडक्यात स्पष्ट करावयाचे तर प्रत्येक जीवाकडून भूत वर्तमान आणि भविष्यात कर्मबंधातून बरेवाईट कर्म झालेले असतात होत असतात आणि होणारही असतात त्याचे चांगले वाईट परिणाम प्रत्येकास कर्मानुसार भोगावेच लागतात तसेच आधी व्याधीचे परिणामही भोगावे लागतात या लीलाकथेत दम्याने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाच्या बाबतीत तसे घडले होते परंतु सदगुरु श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचा दम्याचा आजार पूर्ण बरा झाला सद्यःस्थितीत तुमच्या आमच्या बाबतीत काय घडू शकेल त्यासाठी काय करावयास हवे सद्यःस्थितीत आधुनिक तंत्राचा आधार घेऊन औषधोपचार करावेत परंतु त्याचबरोबर नित्य नियमाने निर्गुण निराकार स्वरुपात वावरणार्या भक्तवत्सल श्री स्वामी समर्थांच्या उपासनेचाही त्यात समावेश असावा येथे रताळी भाजून खा हे सांगण्यामागेही श्री स्वामींचा काहीतरी हेतू दिसतो रताळी ही जमिनीत वाढतात ती घट्ट पक्की असतात असे हे रताळू भाजून खा असे सांगितले म्हणजे सर्वसामान्य जीवामध्ये जो षडरिपू लिप्तपणा असतो तो साधनेच्या माध्यमातून नष्ट करावा म्हणजे रताळी चांगली खरपूस भाजून घ्यावीत म्हणजे कठोर आणि व्रतस्थपणे साधना करावी तीन दिवस रताळी भाजून खा म्हणजे वर वर्णन केलेला अतीत विद्यमान अनागत याचे भान ठेवावे हा लीला कथेचा अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments