क्र (२३) भाकड गाय दुग्धवती केली


मंगळवेढ्यात कृष्णभट कापशीकर नावाचा एक वेदशास्रसंपन्न ब्राम्हण होता शके १७६७(इ.स.१८४५)श्री स्वामी समर्थांची स्वारी दामाजीपंताच्या समाधीपाशी बसली होती त्यांना पाहून कृष्णभट आश्चर्याने चकित झाला तो म्हणाला महाराज आपण कोण कोठील आपल्या दर्शनाने माझे समाधान झाले रात्र होत आली आहे करीता आमच्या घरी येऊन आम्हास पुनीत करावे त्याच्या मनातला भाव ओळखून श्री स्वामी महाराज त्याच्या घरी आले त्याने घरात जाऊन पत्नी गीताबाईस फराळाची तयारी करावयास सांगितले ती म्हणाली घरात तांदूळ वगैरे काही नाही तर आता काय करावे अशा विचारात ती असताच श्री स्वामी म्हणाले आम्हास दुधातील दशमी फार आवडते घरात आहे तेच करा दुसरे काही नको म्हणून पत्नी गीताबाई भांडे व पैसे घेऊन घरोघर फिरली पण तिला दूध न मिळाल्याने ती पती कृष्णभटास सांगू लागली आमचा जन्म व्यर्थ गेला दूध देखील मिळेना तेवढयात श्री स्वामी महाराज म्हणाले अग घरात गाय असून दुधासाठी गावात फिरता काय म्हणावे तुम्हाला त्यावर गीताबाई म्हणाली महाराज गाय दूध देत नाही आज चार वर्षे झाली काय करावे हे ऐकून महाराज म्हणाले काय दूध देत नाही जा भांडे घेऊन दोहन करा म्हणजे दूध देईल श्री स्वामींचे हे वचन ऐकताच गीताबाई भांडे घेऊन दूध काढण्यास बसली असता एक थेंबसुध्दा दूध न देणाऱ्या त्या भाकड गाईने तीन शेराचे पात्र भरून दूध दिले त्या उभयतांना आनंद झाला गीताबाईने ताबडतोब दुधातील दशमी करुन श्री स्वामी समर्थांस वाढली


अर्थ / भावार्थ/ मथितार्थ

वरवर वाचणार्यास ही लीला श्री स्वामींनी एका भाकड गाईस दुग्धवती केली अशी चमत्कारपूर्ण वाटेल पण जरा खोलात शिरुन पाहता श्री स्वामी समर्थ हे दामाजीपंताच्या समाधीपाशीच बसले होते दामाजीपंतांची किमया ही सर्व वाचकांना ज्ञात आहे ती येथे लिहिण्याची आवश्यकता नाही कृष्णभट श्री स्वामीस पाहून चकित का झाला त्यांना विविध प्रश्न विचारुन मोठ्या आदबीने भक्तिभावाने घरी घेऊन का आला तेही त्याच्याकडे का गेले सर्वसाक्षी श्री स्वामींना त्याच्या घरातील दारिद्रय माहित का नव्हते आम्हास दुधातील दशमी आवडते घरात आहे तेच करा दुसरे काही नको असे श्री स्वामी महाराज का म्हणाले असतील या सर्व प्रश्नांनाचे अंतरंग आणि त्याची उत्तरे श्री स्वामी समर्थांच्या एकूण अवतारकार्याची माहिती असणाऱ्यास विस्ताराने स्पष्ट करण्याचे कारण नाही दामाजीपंत मूर्तीमंत त्यागाचे उदाहरण आहे श्री स्वामींच्या अवतारकार्यातही त्याग ठासून भरलेला आहे कृष्णभट वेदशास्रसंपन्न होता त्यास श्री स्वामी महाराजांचे देवत्व आणि आंतरिक तेज जाणवले म्हणूनच तो त्यांना पाहून चकित झाला त्यांना घरी घेऊन आला देव हा भक्तिभावाचा भुकेला असतो श्री स्वामींना ती कृष्णभटात जाणवली म्हणून ते त्याच्या घरी गेले भगवंताला विदुराच्या कण्याही आवडतात आणि सुदाम्याचे पोहेही तो चविष्टपणे सुदाम्याच्या हातून हिसकावून घेऊन प्रेमाने खातो आपल्या घरात आपण कष्टाने नीतीने जे काय मिळविलेले असते ते देवास प्रिय असते म्हणूनच ते गीताबाईस सांगतात घरात आहे तेच करा दुसरे काही नको प्रारब्धाला दोष देत बसण्यापेक्षा श्री स्वामींचे स्मरण करुन सतत प्रयत्नशील असावे विवेकाने वर्तन करावे या लीलेत कृष्णभट आणि गीताबाईस मंगळवेढ्यात सदेह स्वरुपातील श्री स्वामींची कृपा झाली ही तेव्हाची म्हणजे शके १७६७ (इ.स.१८४५)ची घटना आता असे काही घडू शकेल का असा भाबडा सवाल काहींच्या मनात निर्माण होईल तर त्याचे ठाम उत्तर नाही पण श्री स्वामी समर्थउपासना तुम्हाला उपाशी राहू देणार नाही हे निश्चित 

पत्रं पुष्य फलं तोय या मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपह्रतमश्रामि प्रयतात्मनः!!

भावार्थ- 

जो मला (भगवंताला)प्रेमाने पानं फुलं फळे पाणी इ. अर्पण करतो प्रेमाने अर्पण केलेल्या अशा भक्ताच्या वस्तू मी मोठ्या प्रेमाने खातो थोडक्यात इथेसुध्दा भगवान श्री स्वामी समर्थांना कृष्णभटास व त्याची पत्नी गीताबाईस हेच सांगावयाचे आहे की तुझे अंतःकरण मला हवे आहे तू हातात काय घेऊन आलास हे मी पाहात नाही 

"यत्करोषि यदश्रासि यज्जुहोषि ददासि यत
यत्तपथयसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम!!

भावार्थ- हे अर्जुना तू जे कर्म करतोस जे खातोस जे हवन करतोस जे दान देतोस जे तप करतोस ते सर्व मला (भगवंतास)अर्पण कर थोडक्यात म्हणजे भट पती पत्नीस श्री स्वामी असेच सुचवू इच्छितात की तू तुम्ही जे काही कराल ते मला अर्पण करा तेही अनासक्त वृत्तीने 

श्री स्वामी समर्थ 

Post a Comment

0 Comments