क्र (२२) मंगळवेढ्याच्या जनाबाईस विठ्ठल दर्शन


मंगळवेढ्याची जनाबाई एक शूद्र स्त्री नियमितपणे आषाढीच्या वारीस पंढरपूरला विठोबाच्या दर्शनास जात असता पाऊस जोराने पडू लागला भयंकर वारा सुटून विजा कडकडू लागल्या पुढे जाण्याचा तिला मार्गही दिसेना थंडीने ती थरथर कापू लागली तिच्या कडेवर मुलगी व डोक्यावर बोजा होता अशा अवस्थेत ती कळवळून सांभाळ गं माय विठ्ठले असा विठ्ठलनामाचा जयजयकार करीत निघाली वाटेतील निर्जन भयाणता वादळी वारा पाऊस विजांचा कडकडाट यांमुळे ती घाबरून एका वृक्षाखाली बसली समोरच श्री स्वामी समर्थ एका वृक्षाखाली बसलेले तिला दिसले मंगळवेढ्याच्या अरण्यातील असलेल्या श्री स्वामीरायास पाहून ती त्यांच्याजवळ गेली त्यांना साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करु लागली महाराज आजपर्यत विठ्ठलाची वारी कधी चुकली नाही परंतु आज असे हे विघ्न आले काय करावे त्यावर श्री स्वामी समर्थ तिला म्हणाले पंढरपूरातच विठ्ठल आहे आणि इतर ठिकाणी नाही की काय बाई जने परमात्मा सच्चिन्मय तुझ्या ह्रदयी पाहा गं तुझ्याजवळ अखंड विठ्ठलाचा वास आहे असे म्हणून श्री स्वामी कटीवर हात ठेवून तिच्या समोर उभे राहिले तो जनीला श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष विठ्ठल रुपात दिसू लागले ती आश्चर्याने म्हणाली महाराज आपण प्रत्यक्ष चालते बोलते पांडुरंग असून या दीन दासीस दर्शन दिले महाराज माझ्या शरीराच्या वहाणा (जोडे)करुन जरी आपल्या पायात घातल्या तरी हे उपकार फिटणार नाहीत असे कृतज्ञतापूर्वक म्हणून तिने श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घातला पुढे मंगळवेढ्याच्या या जनाबाईने पंढरीची वारी करणे सोडून तिने प्रत्येक एकादशीस अक्ककोटची वारी सुरू केली 


अर्थ / भावार्थ/ मथितार्थ

या लीलाकथेतील जनाबाई सगुण विठ्ठलाची नियमित साध्या सोप्या सरळ पध्दतीने भक्ती आणि प्रपंच करणारी एक साधी भोळी स्त्री आहे जनाबाईसारखे हजारो लाखो कोट्यवधी लोक आपण आजही पंढरपूरची वारी करताना पाहतो या लीलाकथेत वादळीवारा मुसळधार पाऊस आणि आकाशात कडाडणार्या विजेमुळे आषाढी ऐकादशीची पंढरपूरची वारी चुकते की काय असे जनीला वाटले परंतु तिच्या सगुण भक्तीतील एकनिष्ठता ह्रदयाची कळकळ आणि तळमळ अंतरज्ञानी श्री स्वामी समर्थांनी जाणली तेव्हा ते तिला लगेच म्हणाले पंढरपुरीच विठ्ठल आहे आणि तो इतर ठिकाणी नाही की काय तो सर्वत्र अत्र तत्र सगुण आणि निर्गुण स्वरुपात भरून पावला आहे हे विठ्ठल स्वरुपात तिला दर्शन देऊन त्यांनी दाखवून दिले तिच्याजवळ असलेले गाठोडे आणि मुलगी म्हणजे तिचा माया मोह आणि प्रपंच व त्याची अनामिक आसक्तीच होय आपणही अनेक तीर्थयात्रा करीत असताना आपला मनोभाव आसक्ती प्रपंच नाते गोते मनातून काढू शकत नाही जेव्हा सगुण भक्तीत जनाबाईसारखे पराकोटित्व येते (येथे वादळ वारा पाऊस त्यातही आपल्या इष्ट दैवताची (येथे तिला विठ्ठलाची)तीव्रतेने आठवण येते दर्शन होणार नाही म्हणून मन खंतावते तेव्हा निर्गुण भक्तीची पायवाट दिसू लागते हा अर्थबोध तुम्हा आम्हास करुन देणारी श्री स्वामी समर्थांची ही लीला आहे 

श्री स्वामी समर्थ 

Post a Comment

0 Comments