(दररोजच्या नित्य पारायणासाठी) क्र (१३०) आपणास प्रसाद मिळाला आपण घरी जावे

रामचंद्र केरोबा जातीचे शेणवी हे क्षयरोगाने आजारी होते पुष्कळ औषधोपचार करुनही गुण येईना ज्या अॉफिसात ते नोकरीस होते त्या अॉफिस मालकाच्या साहेबाचे दिवाळे निघून रामचंद्र केरोबाची नोकरीही गेली आता काय करावे म्हणून ते काळजीत पडले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे मोठमोठया संकटातून मुक्त करतात अशी अक्कलकोटची कीर्ती त्यांनी ऐकली म्हणून ते त्यांच्या आईसह अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेताच त्यांचे देहभान हरपले फळ फळावळ मिठाई आदी श्री स्वामींस अर्पण करुन हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहिले तोच त्यांच्या तोंडाकडे पाहून हास्यमुखाने श्री स्वामी महाराज म्हणाले अरे इकडे ये नारळ उचलून त्यांच्या पदरात टाकता टाकता म्हणाले तोंड वासून बसलास कशाला आपल्या घरी जा जवळच असलेले सेवेकरी त्यास म्हणाले आपणास प्रसाद झाला आता आपण घरी जावे काही दिवस तेथे राहून त्यांनी श्री स्वामींची सेवा केली श्री स्वामींचा निरोप घेऊन ते मुंबईस आले घरी आल्यावर रामचंद्ररावाची प्रकृती थोड्याच दिवसात सुधारली नुसत्या श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने चांगली दुरुस्त झाली व त्यांना मोठी नोकरीही लागली त्यांनी श्री स्वामी समर्थ सदगुरुरायाची एकनिष्ठेन अक्षय सेवा केली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेत रामचंद्र केरोबास कोणकोणत्या संकटातून जावे लागले याचे वर्णन आले आहे त्यांच्या किंवा त्यांच्या आईच्या या प्रारब्धामुळे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर पडली ते अक्कलकोटला आले श्री स्वामींचे दर्शन घेतले त्यांना आशीर्वादही मिळाला त्या आशीर्वादानेच रामचंद्ररावांची प्रकृतीही सुधारली आणि त्यांना मोठी नोकरीही लागली यात श्री स्वामींचा आशीर्वाद आणि कृपा रामचंद्ररावास मिळाली ही रामचंद्ररावांची त्यांच्या आईची पुण्याई व प्रारब्ध योग श्री स्वामींनी त्यांच्या पदरात नारळ टाकून ते त्यास म्हणाले तोंड वासून बसलास कशाला आपल्या घरी जा श्री स्वामींच्या या उदगारातही निश्चिंतपणाची ग्वाही देणारा जा शब्द आला आहे म्हणजे रामचंद्रा तू निश्चिंत राहा काहीच काळजी करु नको तोंड वासून बसलास कशाला म्हणजे अरे रामचंद्रा विघ्ने संकटे आजार पीडा यांनी भांबावून जाऊ नकोस निर्धाराने आणि निश्चयाने ऊठ आणि त्यांना तोंड दे असा आहे या लीलेतून आपणास असा बोध मिळतो की आपण परमेश्वराच्या कृपेला पात्र होण्यास सदैव प्रयत्नशील असले पाहिजे अनन्याश्चिंतयतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ही श्री स्वामी समर्थांची बिरुदावलीच आहे परंतु यातील अनन्याश्चिंतयतो माम् ही जबाबदारी श्री स्वामी उपासकाची आहे म्हणजे श्री स्वामी समर्थांची उपासना त्यांचे नामस्मरण अनन्यभावाने होत आहे की नाही याची खात्री जागरुकतेने आणि सतर्कतेने झाली तर योगक्षेमं वहाम्यहम् या वचनाचा प्रत्यय श्री स्वामी समर्थ देतातच देतात याचा प्रत्यय देणारी ही लीला आहे.

श्री स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments