क्र (१३१) महाराज आपण प्रत्यक्ष पांडूरंग आहात

रामचंद्र केरोबा उर्फ बळवंतराव भेंडे तातमहाराज यांच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा झाल्यावर ते बिर्हाडी आले दुसऱ्या दिवशी पंढरपुरास जाण्याचा विचार करुन मातोश्रींसह श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले श्री स्वामींनी त्यांचा शुद्धभाव पाहून दोन्ही हात कटींवर ठेवून त्या दोघांना विठ्ठलस्वरुपात दर्शन दिले साक्षात पांडुरंगाची मूर्ती पाहून ते दोघेही तटस्थ झाले थोड्या वेळाने ते दोघेही शुद्धीवर येऊन श्री स्वामी महाराजास म्हणाले महाराज आपण प्रत्यक्ष पांडुरंग असून आम्ही अज्ञानाने आपणास न ओळखून पंढरपुरास जात होतो असे म्हणून त्या दोघांनी श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घातला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

बळवंतरावांना त्यांच्या मातोंश्रीसह पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनास जाण्याची मनोमन इच्छा होती पंढरपूरला जाण्यापूर्वी ते दोघे मायलेक श्री स्वामींच्या दर्शनास व त्यांचा निरोप घेण्याच्या उद्देशाने अक्कलकोटला आले ते दोघे श्री स्वामींच्या दर्शनास येताच श्री स्वामींनी त्यांच्या मनातले पंढरपूरला जाण्याचे प्रयोजन ओळखले लागलीच त्या मायलेकांसमोर प्रत्यक्ष पांडुरंगाच्या स्वरुपात त्यांनी त्या दोघांना दर्शन दिले त्या दोघांनी महाराज आपण प्रत्यक्ष पांडुरंग असून आम्ही अज्ञानाने आपणास न ओळखून पंढरपुरास जात होतो त्या दोघांच्या या उदगारातून श्री स्वामी समर्थांचे अवतारित्व लक्षात येते हेच बळवंतराव भेंडे पुढे तातमहाराज म्हणून मुंबईस प्रसिद्ध पावले श्री स्वामींनी वरील लीला करुन त्यांना कारणपरत्वे का होईना अक्कलकोटास येण्यास भाग पाडले सर्वसाक्षी श्री स्वामी बळवंतरावांची आध्यात्मिक योग्यता जाणून होते त्यांना श्री स्वामींनी शिवोपासनेची गोडी लावली होती क्षय रोगाच्या व्याधीचे फक्त निमित्त होते दुःखद प्रसंग वा दुःखद घटना परमेश्वराची आठवण करुन देत असते दुःखात सापडल्यावर देवाचे स्मरण करणे हा मानवी स्वभावच आहे अर्थात त्यास तातमहाराजांसारखे काही अपवाद असतात त्यांना अक्कलकोटात येण्यास भाग पाडण्याचे व सगुण स्वरुपात दर्शन घडविणे असा उद्देश होता पुढे कोणतीही दवा न घेता त्यांचा क्षय रोग बरा झाला त्यांच्या प्रपंचातील आसक्तीचा मात्र पूर्ण क्षय झाला कारण त्यांना श्री स्वामी समर्थांसारखा अदभुत धन्वंतरी भेटला होता बळवंतराव भेंडे यांच्या संदर्भातला इतर जो मजकूर उपलब्ध आहे त्यावरून असे दिसते की श्री स्वामींनी तोंड वासून काय बसलास घरी जाऊन स्वस्थ बैस त्यांचा मथितार्थ या अगोदर स्पष्ट केलाच आहे पण श्री स्वामींच्या त्या दैवी स्पर्शाने बळवंतरावांचे देहभान हरपले शिवोपासनाच व्रतस्थ आणि कठोरपण सेवा करणारे बळवंतराव भेंडे ऊर्फ रामचंद्र केरोबा हेच पुढे तातमहाराज म्हणून प्रसिद्ध पावले.

श्री स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments