क्र (१०९) कोण आहे रे तो बेडी ठोक

वरील लीलाकथा भागा मध्ये सरदार तात्यासाहेब हर्षे यांची मोहीम अयशस्वी झाल्यामुळे आता श्रीमंत मल्हारराव गायकवाडांनी यशवंतराव येवले या मराठा सरदारस पुष्कळ द्रव्यासह अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांस बडोद्यास आणण्यासाठी पाठविले त्यानेही श्री स्वामी समर्थांस बडोद्यास नेण्यासाठी पूर्ववत क्रम चालविला एके दिवशी श्री श्री स्वामी समर्थांपुढे यशवंतराव हात जोडून उभा राहिला आणि महाराज बडोद्यास चला अशी प्रार्थना करीत असता त्याच्या तोंडाकडे एकटक पाहून श्री स्वामी समर्थ म्हणाले कोण आहे रे तो बेडी ठोक याप्रमाणे तीन वेळा ते म्हणाले पुढे दोन तीन दिवसांनीच बडोद्याहून इंग्रज सरकारचा हुकूमनामा येऊन यशवंतरावास माघारी बोलावण्यात आले विषप्रयोगाच्या आरोपवरुन खटला होऊन मल्हारराव आणि यशवंतराव येवले व दुसरे काही लोक यांस मद्रासेत अटकेत राहावे लागले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांनी सरदार तात्यासाहेब हर्षे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आणि चोळाप्पा व सुंदराबाई सह अन्य काही सेवेकर्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरल्याचे या अगोदर आलेच आहे यावेळीही यशवंतराव येवले आणि त्यांच्या सहकार्यांनी श्री स्वामी समर्थांस बडोद्यास नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले होते वास्तविक श्री स्वामींचे अवतारित्व मल्हाररावांसह सर्वांना अगोदरच ऐकूण होते परंतु सत्ता संपत्ती यापुढे त्यांना श्री स्वामींच्या सामर्थ्याची मातब्बरी वाटत नव्हती श्रीमंत मल्हारराव गायकवाडांचा बडोद्यातील दरबार म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय अंतःकरणातील आध्यात्मिक अज्ञानाचा आणि विषय विकारांचा दरबार होता त्या सर्वांना ईश्वर अवतारी श्री स्वामी समर्थांचा बोध कसा व्हावा त्यांच्याच दरबारातून सरदार यशवंतराव येवले आले होते श्री स्वामींना बडोद्यास नेण्यासाठी विविध युक्त्या प्रयुक्त्या वापरतात पैशाची उधळण करतात या अगोदर श्री स्वामींना बडोद्यास घेऊन जाण्यासाठी तात्यासाहेब हर्षे यांस स्वामींकडून मिळालेली सणसणीत धोबी पछाड विसरून ते पुन्हा निर्लज्जपणे श्री स्वामींना विनवितात महाराज बडोद्यास चला श्री स्वामींना मल्हाररावांसह सर्वांचे अंतरंग कळलेले असते त्या सर्वांच्या दुष्ट कारवायांचा आणि घोर अज्ञानाचा कडेलोट होतो तेव्हा श्री स्वामी कडाडतात कोण आहे रे तो बेडी ठोक आणि खरोखर तसेच घडते मल्हारराव गायकवाड सरदार यशवंतराव येवले व दुसरे लोक यांच्यावर वहीम येतो त्यांना मद्रासेत अटकेत राहवे लागते श्री स्वामींनी केलेल्या भाकिताची प्रचिती येते भगवंताच्या कृपेसाठी सत्ता संपत्ती अधिकार यापेक्षाही जी निष्काम निर्मोही निर्लेप आणि निरपेक्ष भक्ती असावी ती त्या सर्वांमध्ये नव्हती जिथे भक्ती नाही तेथे सदगुरु कृपा नाही सदगुरु कृपा नाही तेथे दुःखास अंतःपार नाही हे सूत्र बोधीत करणारी ही लीला आहे.

श्री स्वामी समर्थ

Post a Comment

0 Comments