क्र (२९) पाऊस पडेल तेव्हा येऊ


आता चिंतोपंत आप्पा टोळ अक्कलकोटच्या शहाजी राजांचे कारभारी होते राजेसाहेबांनी टोळास जरुरीने पाचारण केले आपणही मजबरोबर अक्कलकोटास चलावे अशी टोळ यांनी श्री स्वामींस प्रार्थना केली तेव्हा श्री स्वामी म्हणाले अक्कलकोटास उन्हाळा आहे आपण येत नाही तर मग महाराज आपण अक्कलकोटास केव्हा याल म्हणून टोळ यांनी श्री स्वामींस प्रश्न केला त्यावर ते म्हणाले पाऊस पडल्यावर येऊ पुढे शहाजीराजांची प्रकृती बिघडून आषाढमासी त्यांचा अंत झाला चतुर्मासात पाऊस पडला नाही नंतर दिवाळी झाल्यावर कार्तिकमासी पाऊस पडून पिके चांगली आली मग श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले तेव्हा श्रीमंत मालोजीराजे अक्कलकोटचे गादीवर नुकतेच बसले होते 


अर्थ -भावार्थ-मथितार्थ

मुळात या संपूर्ण लीलेचा संक्षिप्त स्वरुपात आढावा घेणे तसे अवघडच कारण श्री स्वामींनी उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ खूप व्यापक आहे श्री स्वामींनी बाबा सबनीसांना हुमणाबादच्या माणिकप्रभूंसमोर पूर्वीच सांगितले होते अक्कलकोटकू जाव हम भी आवेंगे यावरून श्री स्वामींनी त्यांच्या नियोजित कार्यासाठी अगोदरच अक्कलकोटची निवड करून ठेवली होती त्यांनी केलेल्या भ्रमणाचे वर्णन या अगोदरच्या स्वतंत्र प्रकरणात आले आहेच मंगळवेढ्यात बारा वर्षे मोहोळ पंढरपूर सोलापूर आदि जवळच्या शहर खेड्यात वावरुनही ते जवळच असलेल्या अक्कलकोटास जात नव्हते याचे कारण अजून तेथे जाण्याची वेळ आली नव्हती हेच खरे श्री स्वामी समर्थ जाणून होते की अक्कलकोटात पाऊस पाणी होणार नाही दुष्काळी परिस्थिती ओढवेल शहाजीराजांचा अंत होईल पण या सर्व स्थितीस महाराज घाबरत होते असे मुळीच नाही ते त्यांच्या सामर्थ्याने ही सर्व परिस्थिती पालटण्यास अथवा बदलविण्यास समर्थ होते परंतु तसे सहज केले असते तर लोकांस परमात्म शक्तीचे महत्त्व कळले नसते श्री स्वामींना ते लोकांना प्रसंगाच्या घटनांच्या माध्यमातून उमगू द्यायचे होते म्हणून तर उन्हाळ्याचे निमित्त सांगून पाऊस पडल्यावर येऊ असे ते म्हणाले कारण स्पष्टच आहे जोवर किंमत मोजावी लागत नाही घाम गाळवा लागत नाही डोळ्यातून अश्रूंचे टिपूस निघत नाही तोवर कशाचेच मोल समजत नाही हे श्री स्वामी जाणून होते फक्त लोकांना निदान देवाच्या स्मरणासाठी ती आच धग लागावी असे त्यांना वाटत होते झालेही तसेच पोषणकर्ता शहाजीराजांचा मृत्यू संपूर्ण चतुर्मास कोरडा ठाक हा एक दृष्टीने उन्हाळ्याच होता लोक हवालदिल झाले निसर्गाचा आणि राजाचा आधारच गेला लोकांच्या तोंडचे पाणी पळाले अशा गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांना कोणी त्राताच उरला नव्हता देवा तार रे आम्हास तार आम्हास वाचव असा लोक देवाचा सारखा धावा करु लागले अशाच परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास येण्यास निघाले अश्विन शु.५ शके १७७९ बुधवार दि २३.९.१८५७ ला त्यांचे शुभ आगमन अक्कलकोटात झाले श्री स्वामींच्या आगमनापूर्वी सबंध चतुर्मास पाऊस कसा तो पडला नाही महाराजांचे आगमन झाल्यावर कार्तिक महिन्यात पाऊस तोही भरपूर झाला पिकेही जोमदार आणि चांगली आली श्रीमंत मालोजीराजे अक्कलकोटचे गादीवर आले श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तकाजकल्पर्दूम या नावाची सार्थकता सिध्द केली आम्ही पाऊस पडेल तेव्हा येऊ या वचनाची सत्यता पटविली जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय  असा सर्वांनाच प्रत्यय आला 

श्री स्वामी समर्थ 

Post a Comment

0 Comments