क्र (३७) घुबडाबाबत शुभ अशुभ


एके दिवशी श्री स्वामी समर्थ बाहेर गेले असता चोळप्पाच्या घरात घुबड शिरले घरात घुबड शिरणे हे काहीतरी विपरीत अथवा अशुभ आहे असे समजून चोळप्पाने घरादारास कुलूप लावले मुला बाळांना घेऊन बायकोसह तो खासबागेत जाऊन राहिला श्री स्वामी चोळप्पाचे घरी आले तर तो खासबागेत जाऊन राहिल्याचे त्यांना समजले श्री स्वामींनी तेथे जाऊन चोळप्पास घरी आणले घुबड घरात शिरले म्हणून का कोणी घर सोडते असे म्हणून ते चोळप्पावर रागावले


अर्थ -भावार्थ-मथितार्थ

भगवान परब्रम्हस्वरुप असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या सहवास आणि सेवेत असलेल्या चोळप्पाच्या मनावरही अंधश्रध्देचा शुभ अशुभतेचा किती पगडा होता याची कल्पना या लीलेकथेवरुन येते अंधश्रध्दा रुढी गैरसमजुती धर्मभोळेपणा याचा श्री स्वामींना विलक्षण तिटकारा होता तो त्यांना मान्यही नव्हता म्हणून तर ते चोळप्पावर रागे भरले आता यातून आपण काय शोध व बोध घ्यावयाचा हे सर्वस्वी आपणावर अवलंबून आहे निव्वळ झापडबंदपणाने विचार गहाण ठेवून श्री स्वामींची अथवा अन्य कुणाही देवदेवतांची पूजा अर्चा करणे सर्वथा गैर आणि चुकीचे आहे सध्या आपण २१ व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या कालखंडात वावरत आहोत संगणक मोबाईल ट्टिटर फेसबुक ब्लॉग इंटरनेट आदी हाताळतो आहोत सुजाण आणि सुशिक्षित झाल्याचे सांगत आहोत तरीही काही सन्माननीय अपवाद वगळता अनेक समजुती अंधश्रध्दा अनिष्ट कालबाह्य रुढी परंपरा आपल्या मनात घर करुन आहेत अनेक गोष्टींची भीती शंका कुशंका सर्वसामान्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात यासर्व बाबींचा सारासार विचार केला कारणमीमांसा शोधली तर त्यात काहीच तथ्य नसते पण हे कळत असूनही अनेकदा वळत नाही हेच मोठे दुर्दैव आहे या लीलाकथेतून आता तरी प्रबोधित होऊ या

श्री स्वामी समर्थ 

Post a Comment

0 Comments