क्र (५३) श्री स्वामी समर्थ नामाचा मेणा

खेडमणूराहून श्री स्वामी समर्थ एकदा अक्कलकोटला मेण्यातून जात होते तो मेणा सहा ब्राम्हण वाहून नेत होते पण पाऊस पडल्यामुळे वाटेत खूप चिखल झाला म्हणून तो मेणा पावसातून आणि चिखलातून नेताना त्या सहा ब्राम्हणांना श्रम पडू लागले महाराज मेणा जड लागतो आमच्याने चालवत नाही असे त्या ब्राम्हणांचे म्हणणे ऐकताच श्री स्वामी समर्थ मेण्यातून खाली उतरु पायी चालू लागले सेवेकर्यांनी पुन्हा समर्थांना प्रार्थना केली महाराज आपण जर हलके व्हाल तर आम्ही मेणा उचलू त्यांच्या विनंतीनुसार श्री स्वामींनी आपले वजन फुलासारखे हलके केले श्री स्वामीनामाचा जयजयकार करीत मेणा घेऊन ते सारे नागणसुरास येऊन पोहोचले .


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

या लीलेतील मेणा जड आहे म्हणजे स्वामीनाम घेणे सुरुवातीला तरी जड वाटते मेणा वाहून नेणारे सहा ब्राम्हण म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जेव्हा हे षडरिपू बेबंद मोकाट सुटलेले असतात जेव्हा त्यांनी असुरी उग्र रुप धारण केलेले असते तेव्हा ते घातकच असतात परंतु या षडरिपू लीप्तावर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी नामाचा मेणा ठेवला की त्यांच्या स्वरूप स्वभावात फरक पडतो संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे विषय तो झाला नारायण अशी स्थिती झाल्यास मोठा बदल होतो काम मदन विकार न राहता मधुर भक्तीत रुपांतरित होतात क्रोध हाही तामसीपण विसरुन मवाळ होतो लोभ यातही लौकिक दृष्ट्या नाशिवंत वस्तूचा लोभ नष्ट होऊन परमेश्वर प्राप्तीची ओढ लागते मोहाचे आकर्षण वैराग्याची जागा घेते नवविधा उपासनेचा मोह प्रबळ होतो मद ही लोप पावतो क्षीण होत जातो मत्सर तामसी रुप टाकतो परमेश्वराच्या चिंतनात प्रत्येक क्षण व्यतीत करु लागतो हे सर्व सकारात्मक आनंददायी पारमार्थिक लाभदायक बदल श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी नामाने होऊ लागतात हा या लीलेचा महत्त्वाचा अर्थबोध आहे परंतु स्वामीनामाचा मेणा वाहून नेताना धुवांधार पाऊसरुपाची संकटे उपासनामार्गात चिखल स्वरूप येत असतात त्यातून चालताना दमछाक होत असल्याची जाणीवही होते उपासना खंडित होते की काय अशी धोकादायक अवघड परिस्थिती निर्माण होते हे सारे अटळ आहे पण त्याला घाबरून नामाचा मेणा तसाच खाली ठेवून निघून जाणे योग्य नाही पुन्हा सदगुरुंना प्रार्थना विनंती करीत राहावे मनोभावे विनवावे ते नामजपाच्या उपासनेचा मेणा वाहून नेण्याला निश्चितच सुलभ सुयोग्य परिस्थिती निर्माण करतील हा दृढ विश्वास बाळगावा हाच या लीलेचा महत्त्वपूर्ण अर्थबोध आहे .

श्री स्वामी समर्थ 

Post a Comment

0 Comments